शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:25 IST

BJP Ashish Shelar And Maharashtra Budget 2022 : "पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे."

मुंबई -  राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी  असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे दिसते आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे. कुणाच्या विरोधात आम्ही नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय?याबाबत काहीच बोलले जात नाही असंही म्हटलं आहे. 

इंद्रायणी  मेडिकल सीटी बनविण्याची घोषणा केली. 300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय? याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे. म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलंय. निधीची तरतूद दिसतच नाही.  म्हणून हा अर्थसंकल्प स्वराज्यापेक्षा स्व हिताचा विचार करणारा आहे असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला आहे. 

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBudgetअर्थसंकल्प 2022Maharashtraमहाराष्ट्र