भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज!
By Admin | Updated: October 7, 2014 05:59 IST2014-10-07T05:59:11+5:302014-10-07T05:59:11+5:30
महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करणारी भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.

भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज!
उस्मानाबाद : विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र नरेंद्र मोदींनी रचले आहे. महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करणारी भाजपा म्हणजे अफजलखानाची फौज असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.
तुळजापूर येथील सभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, की महाराष्ट्राला तोडण्याचे भाजपाचे प्रयत्न हाणून पाडण्याची शपथ मी तुळजाभवानीच्या चरणी घेतली. कोणासमोर झुकायचे नाही, असे छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकविले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे मनसुबे कोणी रचत असेल तर कदापि सहन करणार नाही.