मुंबई मनपासाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, महिलांना प्राधान्य
By Admin | Updated: February 3, 2017 08:41 IST2017-02-03T08:14:50+5:302017-02-03T08:41:04+5:30
भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर जाहीर केली आहे.

मुंबई मनपासाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, महिलांना प्राधान्य
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी रात्री उशीरा यादी जाहीर केली.
जाहीर केलेल्या यादीत 195 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर उर्वरित 32 जागा भाजपाने मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.
दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बरीच चर्चा होती मात्र त्या निवडणूक लढवणार नाहीत. मेधा यांच्याऐवजी तेजस्विनी जाधव यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.