शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 14:39 IST

महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

मुंबई - ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत हे जेव्हापासून जेलमधून आले आहे तेव्हा पासून ते बिघडले आहे. त्यांना हे माहिती नाही की सीमावाद हे ७० वर्ष जुना वाद आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी प्रतिक्रिया भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशा शब्दात बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

संजय राऊतांनी केली होती टीकादेवेंद्र फडणवीस यांची बुद्धी नॅनो असून महाविकास आघाडीचा विराट मोर्चा त्यांना नॅनो दिसत असेल तर त्यांना दिल्लीला गेल्यावर गुंगीचे इंजेक्शन दिलं असेल आणि त्याची गुंगी अजून उतरली नसल्याची खोचक टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, शनिवारचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या शक्ती विरोधात होता आणि या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी सामोर जायला पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना फार करून घेऊ नये आपलं राजकीय भविष्य मोठं होणार आहे. होऊ शकतं त्यांच्याकडे ती क्षमता असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. 

राऊतांची बुद्धी नॅनो झाली म्हणून...फडणवीसांच्या टीकेवर शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, आमची बुद्धी नॅनो नाही तर प्रगल्भ आहे. बुद्धी त्यांची नॅनो झाली जे बाळासाहेबांची विचार सोडून अभद्र युतीच्या मार्गाने गेले. कालचा मोर्चा अभद्र युतीचा होता आणि मोर्चात सहभागी तीन लाखांची घोषणा केली प्रत्यक्षात तीस हजार लोक जमा करता आले नाही हे त्यांचं अपयश आहे. संजय राऊतांना दिवसा स्वप्न पडतात. कारखाना बंद पडणार प्रॉडक्शन बंद होणार ही गोष्ट वेगळी आहे. आमच सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणारच आणि आणखी यांना १५ वर्षे येऊ देणार नाही आणि १५ वर्षे हे सरकार पुन्हा येईल अशा प्रकारचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे चालू आहे असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे