भाजपा गांधी परिवाराविरोधात !

By Admin | Updated: February 22, 2016 02:31 IST2016-02-22T02:31:10+5:302016-02-22T02:31:10+5:30

बलिदानाची परंपरा असलेल्या गांधी परिवारातील सदस्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपा व आरएसएस आटापिटा करीत असून, हे उद्योग

BJP against Gandhi family! | भाजपा गांधी परिवाराविरोधात !

भाजपा गांधी परिवाराविरोधात !


शिर्डी : बलिदानाची परंपरा असलेल्या गांधी परिवारातील सदस्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपा व आरएसएस आटापिटा करीत असून, हे उद्योग त्यांनी न थांबविल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल व जशास तसे उत्तर देईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सरकारमधील मंत्रीच सबळ पुरावे नसल्याचे वक्तव्य करतात. सरकारची मानसिकता तपासण्याची गरज आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उरलेल्या नाहीत. पशुधन उद्ध्वस्त झाले आहे, असे विखे म्हणाले.
मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र असा डंका पिटणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काय केले? शिवस्मारकाठी एकही पाऊल टाकले नाही. निवडणूक आल्यावर ते मतांसाठी भूमिपूजन करतील, अशी टीकाही त्यांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: BJP against Gandhi family!