शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 05:11 IST

पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

- विठ्ठल भिसेपाथरी (जि़ परभणी) : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा यांची पाथरी हीच जन्मभूमी असून, या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा पाथरीकरांनी केला आहे. खुद्द शिर्डी संस्थानने १९७४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी साई सचरित्रामध्येच साई बाबांचा जन्म हा पाथरीत झाल्याचा उल्लेख आहे.पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. पाथरी हीच साई बाबा यांची जन्मभूमी आहे़, असा दावा पाथरीकरांनी केला आहे़ या संदर्भात पाथरीकरांकडून श्री साई बाबा यांच्या जन्मासंदर्भातील पुरावेही देण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्टेशनपासून १८ कि.मी.वर असलेल्या पाथरी येथे श्री सार्इंचा जन्म झाल्याचे संशोधन १९७५ मध्ये सर्वप्रथम समोर आले. मुंबई येथील साई भक्त विश्वास खेर यांनी हे संशोधन करण्यासाठी २५ वर्षे खर्ची घातली. १९७८ साली साई संस्थानच्या नावाने त्यांनी विश्वस्त मंडळाची स्थापना करून पाथरी ही श्री सार्इंची जन्मभूमी असल्याचे सांगितले़ विश्वास खेर यांनी पाथरी येथील साईभक्त दिनकरराव चौधरी यांची १९७५ ते ७८ दरम्यान भेट घेतली़ तसेच पाथरी येथील साई बाबांच्या सहवासात आलेल्या अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यात साईबाबांचे वास्तव्य कुठे होते हे सांगण्यात आले़ साई बाबांचा प्रचार करणारे संत दासगणू महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर यांनी त्यांच्याशी चर्चा केली.  त्यावेळीही साई बाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याची बाब समोर आली़ तसेच पाथरी येथील साई बाबांचे जन्म ठिकाण असलेल्या जागेत उत्खनन करताना अनेक वस्तू सापडल्या़ त्यामध्ये धान्य दळण्यासाठीचे जाते, दिवे लावण्यासाठीच्या खापराच्या पणत्या, पुजेची भांडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे़बी़व्ही़ नृसिंह स्वामी यांनी लिहिलेल्या ‘डिवाईन आॅफ साईबाबा भाग १’ या ग्रंथात साई बाबा यांच्या पाथरी येथील जन्माचा उल्लेख आहे़ प्रातिनिधी स्वरुपातील हे काही पुरावे असले तरी जवळपास २९ पौराणिक पुरावे पाथरीकरांकडे उपलब्ध असून, हे सर्व पुरावे जगजाहीर असल्याचे संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी सांगितले़संस्थानचे अन्य एक विश्वस्त तथा कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी पाथरीतील १०० वर्षांच्या तत्कालीन साईभक्त मदार नाना यांनी पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सांगितले होते़शिर्डीकरांना भीतीपाथरीतील साई जन्मभूमीचा विकास झाल्यास भक्तांचा पाथरीकडे ओढा वाढेल, अशी भीती शिर्डीकरांना वाटत आहे़ त्यातूनच त्यांनी पाथरी जन्मभूमीच्या विकासाला विरोध सुरू केला आहे.- आ़ बाबाजानी दुर्राणी, साई संस्थान विश्वस्ततथा कृती समितीचे अध्यक्ष

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर