- संजीव वेलणकर
आज मराठी अभिनेत्री समीरा गुजर हिचा वाढदिवस ... अभिनय आणि सूत्रसंचालनात आपण तिला पाहतच आलो. विविधांगी मालिकांमधूनही ती झळकली झी टीव्हीवरील ‘सावित्री’ या मालिकेतही तिने उत्तम अभिनय दाखवला.
समीरा गुजरने लोकप्रभा मध्ये लिहीलेल्या तिच्या आवडीनिवडी...
वाढदिवस
८ ऑगस्ट
एका शब्दात मी म्हणजे..
खरेपणा
नातं म्हणजे..
विश्वास, आपुलकी
आवडता सिनेमा
चुपके चुपके
आवडता नट/नटी
अमिताभ, माधुरी दीक्षित
आवडलेलं पुस्तक
दुर्गा भागवत यांचं ‘पैस’
माझा आदर्श
दुर्गा भागवत
आवडता परफ्युम
जो उत्तम सुगंध देईल तो.
मला अस्सेच कपडे आवडतात..
पंजाबी ड्रेस, जीन्स-टॉप
माझी गाडी
इंडिका
फर्स्ट क्रश
कुणीच नाही
टर्न ऑन्स
खरेपणा
टर्न ऑफ्स
उर्मटपणा
अ परफेक्ट डेट
त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालेन असं ठिकाण म्हणजेच माझं घर
.. आणि कोणाबरोबर
नवऱ्याबरोबर
माझी वाईट सवय
विसरभोळेपणा
सगळ्यात भावलेली कॉम्प्लिमेण्ट
तुझी मुलाखत घेण्याची पद्धत मला खूप आवडते, तू असल्यावर अजिबात दडपण येत नाही असं मला पद्मजा फेणाणी जोगळेकर म्हणाल्या होत्या.
आपल्या समुहातर्फे समीराला वाढदिवसाच्या सुभेच्छा.
-----------------------------
संदर्भ.लोकप्रभा