गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे प्रसिद्धिपत्रक
By Admin | Updated: January 31, 2015 05:21 IST2015-01-31T05:21:57+5:302015-01-31T05:21:57+5:30
माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांत कर्मचाऱ्यांनी नर्तकीवर पैसे उडविल्याने केडीएमसी चर्चेत आली असताना महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे पत्रक प्रसारमाध्यमांना देण्यात आले

गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे प्रसिद्धिपत्रक
कल्याण : माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांत कर्मचाऱ्यांनी नर्तकीवर पैसे उडविल्याने केडीएमसी चर्चेत आली असताना महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला जयंतीचे पत्रक प्रसारमाध्यमांना देण्यात आले. त्यामुळे जनसंपर्क विभागाचा अजब कारभार समोर आला. ही चूक लक्षात येताच सुधारित पत्रक जारी केले.
शुक्रवारी केडीएमसीत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपायुक्त संजय घरत, सुनील लहाने, सुरेश पवार, कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, रवींद्र पुराणिक आदींनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी सहायक आयुक्त संजय शिंदे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जनसंपर्क विभागाच्या वतीने कार्यक्रमासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात जयंती साजरी झाल्याचा उल्लेख केला होता. (प्रतिनिधी)