शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

देशातील लष्करी रुग्णालयांत दिव्यांगांसाठी सुविधा वाढविणार : लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 17:08 IST

पुण्यातील कृत्रिम अंग केंद्रामुळे अशा अनेक जवानांना कृत्रिम अंगे बसवून त्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढविली आहे.

ठळक मुद्देलष्कराच्या कृत्रिम अंग केंद्राचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन

पुणे : ‘‘ देशाच्या सीमांचे रक्षण करताना अनेक जवानांना अपंगत्व आले आहे. पुण्यातील कृत्रिम अंग केंद्रामुळे अशा अनेक जवानांना कृत्रिम अंगे बसवून त्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढविली आहे. या केंद्राचे काम हे स्तुतीयोग्य आहे. देशातील सर्व लष्करी दवाखाने तसेच विद्यालयांत दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा वाढविण्यात येणार आहेत. यासाठी त्यांना आर्थिक, तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे काम प्रगतिपथावर आहे,’’ असे प्रतिपादन लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी केले.पुण्यातील लष्करी वैद्यकीय सेवेच्या कृत्रिम अंग केंद्राच्या हीरकमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त या केंद्रात विविध कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल पुरी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर, एअर मार्शल आर. एस. ग्रेवाल, मेजर जनरल एस. ए. लांबा, कृत्रिम अंग केंद्राचे प्रमुख ब्रिगेडिअर ए. सी. सिंग तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित निवृत्त लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते.     पुरी म्हणाले, ‘‘देशाच्या सरंक्षणासाठी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांच्या साहसासाठी लष्कराने २०१८ हे वर्ष समर्पित केले. एखादा व्यक्ती अपंग झाल्यावर तशा स्थितीत जगताना तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बºयाचदा मनोबल कमी होते. यामुळे त्या व्यक्तीबरोबरच तिच्या घरच्यांवरही या परिस्थितीचा परिणाम होत असतो. पुण्यातील कृत्रिम अंग केंद्राने अशा जवनांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक कृत्रिम अंगांचा विकास केला आहे. यामुळे अपंगत्व आलेल्या जवानांना या कृत्रिम अंगामुळे पूर्वीसारखी हालचाल करता येत आहे. गेल्या काही वर्षांत या केंद्राने चांगली कामगिरी केली आहे. कृत्रिम अंगांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली आहे. आज अपंग जवानांमध्येही आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे. येत्या काळात अपंग जवनांना कुठल्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी देशभरात कृत्रिम अंग केंद्राच्या उपविभागाची निर्मिती करण्यात आली असून त्यांना आर्थिक तसेच अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. याचबरोबर त्यांना चांगल्या सुविधा देण्यावर यापुढे भर राहील.’’........आजी-माजी अधिकाºयांचा सत्कार निवृत्त अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याचाही या वेळी गौरव करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानdoctorडॉक्टरHealthआरोग्य