बिनधास्त फिरा...हॉटेल, बार, रेस्टॉरंट पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
By Admin | Updated: December 31, 2016 17:31 IST2016-12-31T17:23:18+5:302016-12-31T17:31:40+5:30
पोलीस प्रशासन आणि सरकारने नागरिक आणि हॉटेल चालकांना दिलासा दिला असून बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे

बिनधास्त फिरा...हॉटेल, बार, रेस्टॉरंट पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज असताना पोलीस प्रशासन आणि सरकारने नागरिक आणि हॉटेल चालकांना दिलासा दिला असून बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सेलिब्रेशनच्या निमित्ताने घराबाहेर पडणा-या नागरिकांना रात्री फक्त रस्त्यांवर सेलिब्रेशन करायला लागणार नाही.
इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने पोलिस प्रशासनाला हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. पोलिस महासंचालकांनी बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण यासोबतच हॉटेलमधील सुरक्षेची जबाबदारीही घेण्यास सांगण्यात आलं आहे. एखादा अनुचित प्रकार घडल्यास याची संपुर्ण जबाबदारी संबंधित हॉटेल किंवा बार चालकाची असेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. ध्वनी प्रदषणाच्या नियमांचं पालन करण्याचे आदेशही ऑर्केस्ट्रा चालकांना दिले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राबाहेर आज रात्री साडे 11 ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर या परिक्षेत्रासाठी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.