मनपाच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T01:05:34+5:302014-07-01T01:05:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅगस्टमध्ये नागपुरात येण्याची शक्यता आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नाग नदी

Bimanpujan at the hands of Modi's project | मनपाच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

मनपाच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

आॅगस्टमध्ये नागपुरात येण्याची शक्यता
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅगस्टमध्ये नागपुरात येण्याची शक्यता आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नाग नदी व पिवळी नदीतील सांडपाण्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. या दोन्ही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी उत्तर-मध्य व दक्षिण-मध्य नागपूर असे दोन झोनचे प्रस्ताव तयार करण्यात आले. पिवळ्या नदीच्या शुद्धीकरणासाठी उत्तर-मध्य झोनकरिता ४९१ कोटींच्या प्रस्तावाला जेएनएनयूआरएम अंतर्गत केंद्र शासनाने मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार पिवळी नदीचे उगमस्थान असलेल्या गोरेवाडा ते वांजरापर्यंत १८ किलोमीटरची ट्रंकलाईन पिवळी नदीच्या पात्रातून टाकण्यात येणार आहे. वांजरा येथे मोठी इन्टेक वेल बांधण्यात येणार असून, यातून भांडेवाडी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bimanpujan at the hands of Modi's project