लाचखोर अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती
By Admin | Updated: April 9, 2015 01:32 IST2015-04-09T01:32:25+5:302015-04-09T01:32:25+5:30
ठेकेदाराकडून एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे

लाचखोर अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती
नाशिक : ठेकेदाराकडून एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे़
दशपुते यांच्याकडे पाच लाख ७३ हजार ९६५ रुपये रोख, २३ तोळे सोने, ९१ हजार १२२ रुपये किमतीची चांदीची भांडी तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाच प्लॉटचा समावेश आहे़ बुधवारी त्यांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बहुचर्चित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यानंतर या खात्यातील हे दुसरे प्रकरण आहे़
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाच्या बिलाच्या रकमेची रिलीज आॅर्डर काढणे व बँकेत भरलेली ३३ लाखांची अनामत परत देण्यासाठी दशपुते यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी सापळा रचून लाच घेताना त्यांना पकडले . (प्रतिनिधी)