स्टार्ट अप कंपनी विकून मुंबईत जन्मलेले बंधू झाले अब्जाधीश
By Admin | Updated: August 24, 2016 04:30 IST2016-08-24T04:30:04+5:302016-08-24T04:30:04+5:30
मुंबईत जन्मलेल्या दोन भावांनी जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप कंपनी चीनच्या कंपनीला विकून तब्बल ९00 दशलक्ष डॉलर कमावले आहेत.

स्टार्ट अप कंपनी विकून मुंबईत जन्मलेले बंधू झाले अब्जाधीश
मुंबई : मुंबईत जन्मलेल्या दोन भावांनी जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप कंपनी चीनच्या कंपनीला विकून तब्बल ९00 दशलक्ष डॉलर कमावले आहेत. दिव्यांक तुराखिया (३४) आणि भावीन (३६) अशी त्यांची नावे आहेत. मुंबईतील जुहू आणि अंधेरी उपनगरात वाढलेले हे बंधूद्वय कुमारवयातच व्यवसायात पडले होते. त्यांची ‘मीडिया डॉट नेट’ ही कंपनी चीनमधील ‘बीजिंग मिटेनो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ या कंपनीने खरेदी केली आहे. (प्रतिनिधी)
>जाहिरात क्षेत्रातील सर्वांत मोठा सौदा
हा जाहिरात क्षेत्रातील सर्वांत मोठा अधिग्रहण आणि विलिनीकरण सौदा ठरला आहे. या पूर्वी गुगलने ७५0 दशलक्ष डॉलर मोजून ‘अॅडमॉब’ची, तर ट्विटरने ३५0 दशलक्ष डॉलर मोजून ‘मॉबपब’ची खरेदी केली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे, जगभरातील जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असताना तुराखिया बंधूंनी आपली कंपनी जबरदस्त किमतीला विकण्यात यश मिळविले आहे.
06 वर्षांपूर्वी तुराखिया बंधूंनी मीडिया
डॉट नेटची स्थापना केली होती. दुबई आणि न्यूयार्क येथे कंपनीचे
तळ आहेत. याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बड्या कंपन्यांना ती सेवा देत होती.
गेल्या वर्षी कंपनीने
२३0 दशलक्ष डॉलरचा व्यवसाय केला होता. अमेरिकेत राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असणाऱ्या दिव्यांक यांनी सांगितले की, आजच्या सौद्यानंतर आम्ही व्यवस्थापन करीत असलेला व्यवसाय १.४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मीडिया डॉट नेटचे अधिग्रहण दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात बीजिंग मिटेनोचे चेअरमन झांग झियोंग हे गुंतवणूकदारांचा पुंज स्थापन करतील. त्यानंतर, प्रत्यक्ष अधिग्रहण प्रक्रिया पार पाडली जाईल.11 स्टार्ट अप कंपन्या वांद्र्यातील आर्य विद्यामंदिर शाळेत शिकलेल्या दिव्यांक आणि भावीन यांनी डायरेक्टी समूहाच्या छत्राखाली स्थापन केल्या आहेत.या व्यवहारानंतरही दिव्यांक तुराखिया मीडिया डॉट नेटसोबत काम करणार आहेत. भावीन हे मात्र आपली दुसरी कंपनी ‘डायरेक्टी’चा कारभार पाहतील. डायरेक्टी समूहामार्फत चार स्टार्ट अप कंपन्या चालविल्या जातात.तुराखिया बंधूंचा हा पहिलाच विक्री सौदा नाही. या पूर्वी त्यांनी डायरेक्टी अंतर्गत येणाऱ्या काही व्यवसायांची नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध एंड्युरंस इंटरनॅशनल समूहाला १६0 दशलक्ष डॉलर्सला विक्री केली होती.