वीज बिलाचा घोळ!
By Admin | Updated: August 28, 2014 02:03 IST2014-08-28T02:03:40+5:302014-08-28T02:03:40+5:30
वीज ग्राहकांकडील वीज मीटर सुरळीत सुरू असताना, ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविले जात आहे. शिवाय काहीच दिवसानंतर अचानक ग्राहकांच्या बिलात वाढ होते. यातून वीज ग्राहकांची आर्थिक

वीज बिलाचा घोळ!
‘एसएनडीएल’विरुद्ध नाराजी : नागरिक त्रस्त
नागपूर : वीज ग्राहकांकडील वीज मीटर सुरळीत सुरू असताना, ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविले जात आहे. शिवाय काहीच दिवसानंतर अचानक ग्राहकांच्या बिलात वाढ होते. यातून वीज ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असून, सरासरी वीज बिलाचा हा घोळ ताबडतोब थांबवा, अशा मागणीसह अनिल पांडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने सोमवारी स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या कार्यालयात धडक दिली. दरम्यान एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराणा यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून, त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. पांडे यांच्या मते, वीज ग्राहक नियमित बिलाचा भरणा करीत असेल, तर त्याच्या बिलातील वीज दराच्या स्लॅबमध्ये वाढ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु अचानक वीज बिलात वाढ होत असेल, तर ग्राहकाला १० रुपयाऐवजी १३ रुपये प्रति युनिट दराने बिल भरावे लागते. ही ग्राहकांची सर्रास लूट आहे. ती थांबली पाहिजे. परंतु एसएनडीएलतर्फे वाढीव बिलाचा विरोध केल्यास, वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे एसएनडीएलने हा प्रकार ताबडतोब थांबविला नाही, तर यासंबंधी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी नाना असलम, भीमराव राउत, मनोहर नागपुरे, मोतीराव सवाणे, अशोक तिडके, प्रवीण कुमार व जगदीश खोडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)