परिवहनच्या बसमधून दुचाकीची वाहतूक
By Admin | Updated: July 2, 2016 03:29 IST2016-07-02T03:29:47+5:302016-07-02T03:29:47+5:30
बसमधून प्रवाशांना उतरवून स्वत:ची दुचाकी बसमध्ये चढवण्याची दादागिरी महापालिकेच्या नवीन पाटील या चालकाने केल्यामुळे प्रवासी संतप्त झाले

परिवहनच्या बसमधून दुचाकीची वाहतूक
वसई विरार पालिकेच्या खच्चून भरलेल्या बसमधून प्रवाशांना उतरवून स्वत:ची दुचाकी बसमध्ये चढवण्याची दादागिरी महापालिकेच्या नवीन पाटील या चालकाने केल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
वसई कोर्ट ते वसई स्टेशन अशा महापालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये हा प्रकार घडला. सायंकाळी ५ वाजता कोर्टनाक्यावरून निघालेल्या बसमध्ये प्रवासी खच्चून भरले होते. या प्रवाशांना बळजबरीने खाली उतरवून चालक नवीन पाटील याने दुचाकी बसमध्ये चढवली. त्यामुळे प्रवाशांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्याकडे सदर प्रकार कथन केला.
नवीन पाटील हा स्वत:चा मनमानी कारभार करित असतो. बसमधून प्रवास करणाऱ्या महिला,जेष्ठ नागरिक,विद्यार्थी यांना अरेरावीची भाषा वापरून तो शिवीगाळही करित असतो. त्यामुळे प्रवाशी बसमधून प्रवास करण्यास कचरत आहेत. याप्रकरणी गुंजाळकर यांनी आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.