शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 21:28 IST

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा,

ठळक मुद्देराष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा

पुणे : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाने देशासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. आर्थिक बेशिस्त आणि नियोजनाच्या अभावामुळे उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे. वित्तीय तुट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणताही ' रोडमॅप' नाही. त्यामुळे २०२० हे वर्ष आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भयंकर असेल, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शर्मा यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या जरिता लेतफ्लँग, माजी खासदार रजनी पाटील, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते. शर्मा म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षातील कामाचा हिशेब जनतेसमोर मांडणे गरजेचे होते.  राज्याशी संबंध नसलेले विषय मांडले जात आहेत. आपल्याकडे व्यक्तीवाद वाढला असून तो लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीकी शर्मा यांनी केली.नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा, अशा शब्दांत शर्मा यांनी पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण केले जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. ---------अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी कराभुकेच्या निदेर्शांकात भारतापेक्षा पाकिस्तान, बांग्लादेश पुढे असल्याचे वास्तव आहे. जगातील मागासलेल्या देशांच्या पंक्तीत आपण आहोत. गुजरातमधील दोन जिल्हेही कुपोषणात आघाडीवर आहेत, अशी टीका शर्मा यांनी केली. भाजपा व शिवसेनेकडून पाच व दहा रुपयात जेवण देण्याच्या आश्वासनावर बोलताना त्यांनी अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयल