शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सेन्सेक्सची मोठी आपटी

By admin | Updated: April 29, 2016 05:24 IST

मुंबई शेअर बाजारात दोन दिवसांपासून आलेल्या तेजीला ब्रेक लागला

मुंबई : बँक आॅफ जपानने बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल न देण्याचा निर्णय घेतल्याने आणि गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने मुंबई शेअर बाजारात दोन दिवसांपासून आलेल्या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ४६१ अंकांनी घसरून २५,६0३ अंकांवर, तर निफ्टी १३३ अंकांनी घसरून ७,८४७ अंकांवर आला. सेन्सेक्समध्ये गेल्या तीन आठवड्यांतील एकाच दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे.आज जागतिक बाजारात निराशाजनक वातावरण होते. बुधवारी रात्री अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला, तर गुरुवारी बँक आॅफ जपाननेही तसाच निर्णय घेऊन व्याजदर शून्याने 0.१0 टक्कादरम्यान कायम ठेवून सर्वांना चकित केले. शिवाय बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही भांडवल न ओतण्याचा निर्णय घेतला. बँक आॅफ जपानकडून व्याजदर कपातीची अपेक्षा होती, तसे झाले नाही. या दोन्ही निर्णयांचा बाजारावर विपरीत परिणाम झाला.विदेशी बाजारात असलेल्या स्थितीने मुंबई शेअर बाजार दबावाखाली आला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २७ कंपन्या तोट्यात गेल्या आणि केवळ टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, ल्युपिन या कंपन्यांचे शेअर्सच वधारले. सर्वात जास्त ३.२१ टक्के घसरण एचडीएफसीमध्ये झाली. त्यानंतर अन्य टीसी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअरही तीन टक्क्यांनी घसरले. बीएसईतील सर्व २0 समूह तोट्यात राहिले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमधील ५१ पैकी ४२ कंपन्यांत विक्रीचा जोर राहिला. प्रारंभी, सेन्सेक्स १४.१६ अंकांनी वधारून २६,0७८.२८ अंकांवर खुला झाला. दिवसभरात तो २६,१00.५४ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला; पण त्यानंतर जागतिक दबावाखाली गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केल्याने बाजार पुन्हा सावरू शकला नाही. बुधवारच्या तुलनेत तो १.७७ टक्क्याने म्हणजे ४६१.0२ अंकांनी घसरून १२ एप्रिल रोजी असलेल्या २५,६0३.१0 अंकांवर आला. ५ एप्रिलनंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. ‘निफ्टी’ही प्रारंभापासून दबावात राहिला. बुधवारी बाजार बंद होताना असलेल्या भावाच्या तुलनेत १२.५0 अंकांनी घसरला. ७,९६७.४0 वर खुला झाला. काही वेळातच तो ७,९९२ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला; पण त्यानंतर येथेही विक्री सुरू झाली आणि शेवटी १.६६ टक्क्यांनी म्हणजे १३२.६५ अंकांनी घसरून ७,८४७.२५ अंकांवर बंद झाला.>विदेशी बाजारातही पडझडदिवसभरात मध्यम आणि छोट्या कंपन्यांवर कमी दडपण राहिले. बीएसईत एकूण २६९६ कंपन्यांच्या शेअरमध्ये व्यवसाय झाला. त्यापैकी १६९६ कंपन्यांत घसरण झाली, तर ८३५ कंपन्यांचे शेअर वधारले. १६५ कंपन्यांच्या शेअरमध्ये काहीही बदल झाला नाही.विदेशी बाजारात ब्रिटनचा एफटीएसई प्रारंभीच 0.९१ टक्क्यांनी घसरला. जवानचा निक्केई ३.६१ टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.७२ टक्के, चीनचा शांघाय कंपोझिट 0.२५ टक्के घसरले. मात्र हाँगकाँगचा हँगसँग 0.१२ टक्क्यांनी तेजीत राहिले.