शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:45 IST

NCP Ajit Pawar Group News: गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला राखणाऱ्या एका माजी आमदाराने अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

NCP Ajit Pawar Group News: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून महायुतीतील घटक पक्षात विरोधी पक्षांचे नेते सामील होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसला. यानंतर माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते मोठ्या प्रमाणात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होत आहेत. यातच नाशिकसह अनेक ठिकाणी ठाकरे गटाला खिंडार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा कोकणात उद्धवसेनेला धक्का बसला आहे. माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही जाहीर प्रवेश केला. 

हा माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे

१६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तुकाराम सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात, हा माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले. १९९५ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले, अशी कबुलीही सुनील तटकरे यांनी दिली. तसेच तुमच्या धाटणीला बाजूला सारून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील झाला आहात, हा श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासात दिवस उजाडला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. 

दरम्यान, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसतच आहे. पक्षाला मोठे खिंडार पडताना दिसत आहे. नाशिकमध्ये एकीकडे सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले. तसेच पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव, मध्य प्रदेश, राजस्थान येथीलही पदाधिकारी, नेतेही शिवसेना शिंदे गटात आले. यातच कोकणातील माजी आमदारांनी अजित पवार गटात केलेला प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना