शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:09 IST

NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. गावागावात जाऊन काम करायचे आहे. तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशावेळी दिली.

NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे मात्र शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापनदिनीच साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष, शिस्तीने चाललो नाही म्हणून पराभव

भाजपा शिस्तीने चालणारा हा पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शिस्तीने चालत नव्हतो, म्हणूनच आपला पराभव होत होता.  आपल्या तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. निवडणुका तोंडावर वेळ कमी आहे. शेतकरी कामात व्यस्त असतात. गावागावात जाऊन पक्षाचे काम करायचे आहे, असे सत्यजित पाटणकर यांनी यावेळी सांगितले. या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावच्या सरपंच सारिका योगेश पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, सत्यजीत पाटणकर यांच्या रुपाने साताऱ्यातून भाजपमध्ये हाडामासाचा पदाधिकारी सहभागी होत आहे, याचा आनंद आहे. सरकारच्या योजना प्रामाणिकपणे राबवणारा हा पक्ष आहे. आपण ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी गॅरंटी रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच विटा, सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार