शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:42 IST

new corona virus Strain in Maharashtra: जगभरात एकीकडे कोरोनाचा दुसरा, तिसऱा स्ट्रेन धुमाकूळ घालू लागलेला असताना ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याने नागरिक पुन्हा लॉकडाऊनच्या दहशतीमध्ये आहेत. एकीकडे मास्क न घालता वावरणे अगदी सामान्य माणसांपासून ते पोलीस, राजरकीय नेत्यांपर्यंत सुरु आहे. त्यातच अमरावत, यवतमाळसह साताऱ्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून नवा स्ट्रेन धुमाकूळ घालतोय की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. (Maharashtra: No new case of new COVID-19 strain has been found in Yavatmal, Amaravati and Satara districts.)

यावर आता आरोग्य विभागाने पुन्हा कोरोनाच्या विळख्यात जात असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यात गेल्य़ा काही दिवसांत जे नवीन रुग्ण सापडले त्यांच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे जगभरात एकीकडे कोरोनाचा दुसरा, तिसऱा स्ट्रेन धुमाकूळ घालू लागलेला असताना ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. 

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या  नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिली. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी निर्बंध पुन्हा लादण्यात आले असून काळजी न घेणाऱ्या नागरिकांवर त्वरीत कारवाई, गुन्हे, दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

राज्यात रुग्णवाढीने चिंता, दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदानगुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी  लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे काय म्हणालेले...

सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम  पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.

पुन्हा कडक निर्बंध- लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार- उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार- कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या