शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही  : विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:24 IST

जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ते (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) वर संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणुक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासव गतीने सुरू आहे

बुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही

 

कृत्रिम बुध्दिमत्ता : विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा

 

पुणे : जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ते (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) वर संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणुक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासव गतीने सुरू आहे. अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अभ्यासक्रमात कृत्रिम बुध्दिमता एका विषयापुरतीच मर्यादीत राहिली आहे. केवळ वरवरचे ज्ञान मिळण्यापलीकडे संशोधनाला फारसा वाव नाही. कृत्रिम बुध्दिमत्तेसाठी पुरक ‘इको सिस्टीम’च नसल्याने शिक्षणासह संशोधन क्षेत्रात त्यासाठी भरीव गुंतवणुक करण्यास कोणीच पुढे येत नाही.

           अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठाने कृत्रिम बुध्दिमतेवर संशोधनासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विद्यापीठाकडून तब्बल १ अब्ज डॉलर्स एवढी मोठी गुंतवणुक केली जाणार आहे. तसेच जगभरातील विकसित देश संगणकामध्ये मानवी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही मागील काही वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. पण संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्याला मर्यादा आल्या आहेत. याला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, भारतात ८० च्या दशकाच्या शेवटीपासून संगणक क्षेत्रातील संशोधनाला सुरूवात झाली. तर ९० च्या दशकात कृत्रिम बुध्दिमतेवर काम सुरू झाले. सी-डॅक संस्था त्यामध्ये मोठे योगदान देत आहे. पण मानवी बुध्दीला पार करणे कठीण असल्याचे त्यावेळी लक्षात आल्यानंतर संशोधनाची गती मंदावली. गेल्या काही वर्षात संशोधनाला पुन्हा गती मिळाली आहे. अनेक परदेशी कंपन्यांचे संशोधन भारतात सुरू आहे. त्यामध्ये आपलेच अभियंते, तज्ज्ञ अधिक आहेत. आयआयटी, विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. पण निधीअभावी त्याला काही मर्यादा आहे. तज्ज्ञ असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा, वातावरण नाही. तुलनेने खासगी क्षेत्रात बºयापैकी संशोधन होत आहे.

                सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये संगणक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात ‘कृत्रिम बुध्दिमत्ता’ केवळ एका विषयात सामावलेली आहे. पण काही शैक्षणिक संस्था रोबोटिक्स, मशिन लर्निंग यांसह विविध विषयांत अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुर्वी तर केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमातच हा विषय होता. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्त्तेमध्ये अधिक संशोधनासाठी आपल्याकडे आवश्यक ‘इको सिस्टीम’ तयार झालेली नाही. कृत्रिम बुध्दिमत्तेचे शिक्षण मिळाल्यानंतर त्या क्षमतेचे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातही त्याचा पुरेसा वापर असायला हवा. भारतात असे उद्योग खुप कमी आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादीत असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करणे सध्यातरी गरजेचे नाही. आपल्याकडे तेवढी बुध्दिमत्ता असली तरी संशोधनाची संस्कृति विकसित झालेली नाही.  तेवढ्या क्षमतेच्या प्रयोगशाळा तयार झालेल्या नाहीत. संशोधनामध्ये गुंतवणुक करून पुरेसा परतावा मिळत नाही. त्यामुळे शासनासह उद्योग क्षेत्रही त्यात पैसा गुंतविण्यासाठी पुढे येत नाहीत. प्रगत राष्ट्रांमध्ये याउलट चित्र आहे. 

 

विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग अंतर्गत रोबोटिक्स अ‍ॅन्ड आॅटोमेशन हा बी.टेक अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामध्येच कृत्रिम बुध्दिमत्तेवर प्रकाश टाकलो जातो. सध्या ‘चॉईस बेस्ड’ शिक्षण पध्दतीचा काळ आहे. त्यानुसार अभ्यासक्रम सुरू केले जातात. जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ता यावर संशोधन सुरू आहे. म्हणून प्रत्येक संस्थेने त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या गरजा, रोजगाराच्या संधी ओळखून बदल करणे आवश्यक आहे. तसेच कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची मान्यता व इतर गोष्टींचा अडसर येतो. विद्यापीठाकडे संशोधनासाठी आवश्यक प्रयोगशाळा, तज्ज्ञ उपलब्ध आहेत. पण सध्यातरी ‘चॉईस बेस्ड एज्युकेशन’ला प्राधान्य दिले जात आहे. 

- ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दीपक आपटे, कुलसचिव

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

अपेक्षित गुंतवणुक, अनुभव नाही

भारतामध्ये संशोधन क्षेत्रात शासनाकडून अमेरिकेच्या तुलनेत ५ टक्केही गुंतवणुक केली जात नाही. खासगी क्षेत्रात मात्र तुलनेने चांगले संशोधन होत आहे. रोबोटिक्समध्ये प्रगती केली जात आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता ही संकल्पना खुप मोठी आहे. त्यासाठी अनुभवी तज्ज्ञही आपल्याकडे पुरेसे नाहीत. त्यासाठी पदवी स्तरापासून स्वतंत्र अभ्यासक्रम करण्याची गरज आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाकडे पर्यायी विषय म्हणून पाहिले जाते. परदेशातील बहुतेक संस्था, विद्यापीठे खासगी आहेत. आपल्याकडे शासनाचे नियंत्रण असल्याने निधी न मिळण्याबरोबरच नियम, धोरणांचा अडसर मोठ्या प्रमाणावर येतो. 

- दीपक शिकारपुर, प्रसिध्द संगणकतज्ज्ञ

कृत्रिम बुध्दिमत्तेचे क्लस्टर

नोएडा येथील बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई)पुढाकारातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था एकत्रित आल्या आहेत. त्यामध्ये संस्थांमधील तज्ज्ञ, विविध प्रकल्प, प्रयोगशाळा यांची देवाणघेवाण होऊन कृत्रिम बुध्दिमत्तेला चालना मिळेल. अद्याप हे प्राथमिक स्तरावर आहे. पण आपल्याकडे आता याबाबतीत मोठी प्रगती झालेली दिसते. पण शैक्षणिक संस्थांमध्ये त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. निधीची कमतरता असते. अभियांत्रिकीच्या एकाच शाखेत एक विषय म्हणून याचा समावेश आहे. याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृत्रिम बुध्दिमत्ता क्लबही सुरू केला आहे. त्यानुसार विद्यार्थी व प्राध्यापक एकत्रित येऊन विविध प्रकल्पांवर विचारविनिमय करतात. 

- डॉ. बी. बी. आहुजा, संचालक कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, पुणे

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीscienceविज्ञान