शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भाजपाला धास्ती; राज्यात लोकसभेसोबत विधानसभा टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:51 IST

उद्धव ठाकरेंची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपची रणनीती

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. विधानसभा निवडणुका वेळेवरच होतील. उद्धव ठाकरे यांना मिळणारी जनतेची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही म्हटले होते की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लवकर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात.पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांची चिंता आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी तोडण्याची तयारी सुरू आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळते की काय, अशी काळजी भाजपला आहे.

लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात थेट लढत होते. याचा फायदा भाजपला मिळतो; पण विधानसभा निवडणुका सोबत घेतल्यास लोकसभा निवडणुकीत नुकसान होऊ शकते. कारण, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नावावर मत पडणार आहे. तेव्हा ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार नाही.

काय आहे रणनीती ?उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसत आहे. ही सहानुभूती रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अभियान चालविण्यास महाराष्ट्र भाजपला सांगितले आहे. तसेच, सामान्य जनतेपर्यंत काही मुद्दे पोहोचविण्यास सांगण्यात आले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व सोडणे आणि हिंदुत्वाच्या विरोधकांसोबत आघाडी करण्याचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या मार्गावरून स्वत:ला दूर केले. तसेच, ज्या काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, या मुद्द्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३५ जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी