शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 20:28 IST

या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे त्यांना अपात्र का करू नये?, अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजाववण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीय आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ८ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. तर शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. तसेच, नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी देखील कोणतीही नोटीस बजावली नाही. 

'या' आठ आमदारांना नोटीसविधीमंडळाकडून अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. खरा पक्ष कोणाचा? यावरुन दोन्ही गटात आता कायदेशीर लढाई देखील सुरु झाली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा