शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! भाजपा उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार; फडणवीसांचा शपथविधी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 22:49 IST

उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपाच्या गोटाच आनंद साजरा केला जात आहे. ताज हॉटेलवर सर्व आमदार जमले असून उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची माहिती मिळत आहे. 

उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत. यानंतर भाजपा सत्तास्थापनेच्या हालचाली करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

१ जुलै रोजी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळतात, काय वाटाघाटी होतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले...

आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा देतोय. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे