‘अन्सर की’ घोटाळ्यात मोठे मासे!

By Admin | Updated: November 4, 2014 02:39 IST2014-11-04T02:39:09+5:302014-11-04T02:39:09+5:30

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीतील प्रश्नपत्रिका फुटल्या कशा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

Big fish in 'Unsee' scandal! | ‘अन्सर की’ घोटाळ्यात मोठे मासे!

‘अन्सर की’ घोटाळ्यात मोठे मासे!

औरंगाबाद/यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीतील प्रश्नपत्रिका फुटल्या कशा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘अन्सर की’ विकणाऱ्या टोळीचा सूत्रधार मकरंद खामणकरला पोलिसांनी प्रश्नपत्रिका कुणी दिल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘खाक्या’ दाखविला. मात्र, तो तोंड उघडण्यास तयार नाही. ‘साहेब मी जर लींक उघड केली तर माझा जीव जाईल,’ असे तो पोलिसांना सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून या रॅकेटमध्ये मोठमोठे मासे अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी यवतमाळला जाणार आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे २ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागांच्या जवळपास १०५ पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेच्या ‘अन्सर की’ औरंगाबादच्या एका टोळीने फोडल्या असून, पैसे घेऊन त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़
त्यानंतर शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद पोलिसांनी सातारा परिसरात सापळा रचून टोळीचा सूत्रधार तथा विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर, वाडेकर क्लासेसचा संचालक दादासाहेब राधो वाडेकर, भागिनाथ साहेबराव गायके, मध्यवर्ती बँकेतील क्लर्क विनोद दत्तात्रय वरकड, परभणी आरटीओतील लिपिक पोपट कऱ्हाळे, महेश गायकवाड (रा. धामनगाव, आमरावती), महादेव नायसे (रा. बोरगाव, अकोला), सुरेश आरसूळ (रा. पराडा, अंबड, जालना), काळूसिंग नायमनी (रा. शेवगा, औरंगाबाद), केशव सोनकांबळे (रा. परभणी), सचिन गायकवाड (रा. हडको, औरंगाबाद) या ११ जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडे अन्सर की सापडल्या. तसेच विद्यार्थ्यांकडून यापोटी घेतलेल्या १३ लाख ७८ हजार रुपयांची रोकडही सापडली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Big fish in 'Unsee' scandal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.