शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:27 IST

अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू झाल्यानंतर कर्मचारी स्वतःचा जोव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापनाचा निर्णय: ५० लाख रूपयांची मदत मिळणार

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यातच राज्य सरकारने अनलॉक-४ मध्ये एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसलेही संरक्षण नव्हते. पण आता एसटी महामंडळाकडून कोविड काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यू आल्यास ५० लाखांचे विमा कवच देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे एसटी सलग साडेचार महिने बंदच होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून काही गाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारने एसटी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याने राज्यातील बहुसंख्य मार्गांवर आता एसटी जात आहे. चालक, वाहक त्यासाठी काम करत आहेत. एसटीची कार्यालयेही सुरू झाली आहेत. पण इतक्या दिवस जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी महामंडळाने विमा कवच जाहीर केले आहे. आता एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबधिताला यापुढे ५० लाख रूपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी महामंडळाकडे असलेल्या अपघात मदत निधीचा वापर करण्यात येणार आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना विम्याचे वगैरे संरक्षण नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्याची दखल घेऊन महामंडळ प्रशासनाने हे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबधित कर्मचाऱ्यांच्या निकटच्या वारसास आता ५० लाख रूपये मिळतील. त्यासाठी प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकाच्या अध्यक्षतेखाली लेखा अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी यांची एक समिती असेल. या समितीसमोर संबधित प्रकरणाची कागदपत्रे, मृताचे निकटचे कायदेशीर वारस, वगैरेची छाननी होईल. त्यानंतर निर्णय होईल. मदतीचे ५० लाख रूपये निकटचा वारस निश्चित झाल्यावर त्याच्या खात्यात जमा करण्यात येतील. महामंडळाच्या अपघात मदत निधीतून ही रक्कम घेण्यात येईल असे मुख्य कार्यालयाकडून सर्व विभाग नियंत्रकांना कळवण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू