शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाचा मोठा निर्णय: राज्यातील सर्व तलाठी दप्तर ऑनलाईन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 11:16 IST

तलाठ्याकडील सर्व 1 ते 21 गाव नमुने एका क्लिक'वर 

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : ऑनलाईन सातबार, ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ अ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्‍वी झाल्यानंतर शासनाने आता संपूर्ण तलाठी दप्तरच ऑनलाईन करण्याचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. या अंतर्गत तलाठ्याकडे येणारे सर्व 1 ते 21 नमुन्यांची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. 

महसूल विभागात सर्वात महत्वाचा दुवा व थेट लोकांशी संपर्क असलेला घटक म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या २१ नमुन्यांची माहिती ठेवण्यात आलेले असतात. यामध्ये गाव नमुना क्रमांक एक ते २१ असतात. त्यापैकी सातबारा, आठ अ आणि फेरफार उतारे यांचा संबंध हा नागरिकांशी येत असतो. सातबारापैकी सात क्रमांकाचा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा असतो, तर बारा नंबरचा उतारा हा पिकांसंबंधीचाअसतो. गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, कब्जेदाराचे नाव, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्रफळ, हक्क आदी तपशील देण्यात आलेला असतो. नमुना बारामध्ये पिकाखालील क्षेत्रफळाची माहिती दिलेली असते. ८ अ या उताऱ्यामध्ये एका व्यक्तीच्या असलेल्या गटांची माहिती असते. जमिनीच्या खरेदी विक्री झाल्यानंतर त्याप्रमाणे फेरफार उताऱ्यामध्ये नोंदी केल्या जात असतात. ही सर्व माहिती आजवर हस्तलिखित असल्याने त्यामध्ये असंख्य मानवी चुका झाल्या होत्या. तसेच साधी शेतसा-याची नोंद करण्यासाठी देखील लोकांना तलाठी ऑफीसमध्ये हेलपाटे मारावे लागतात. यासाठी अनेक वेळा शंभर रुपयाच्या कामासाठी दोनशे रुपये खर्च करावा लागतो.  यामुळेच तलाठी दप्तर ऑनलाईन झाल्यानंतर अनेक लहान मोठी कामे घर बसल्या करणे शक्य होणार आहे. ---प्रचंड मोठे काम संपूर्ण राज्यातील तलाठी दप्तर ऑनलाईन करणे प्रचंड मोठे काम आहे. सध्या ऑनलाईन सातबार, ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ अ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे. यामुळेच पुढचे पाऊल म्हणून संपूर्ण तलाठी दप्तर ऑनलाईन करण्याचा निर्णय महसुल विभागाने घेतला आहे. यामुळे लोकांना अनेक सुविधा घर बसल्या मिळणार असून, तलाठ्यांची कामे देखील सोपी होणार आहेत. पैशाचा हिशोब ऑनलाईन होईल,  खातेदारांची मागणी ताळमेळ सोपा होईल. - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा  राज्य समन्वयक ई-सातबारा प्रकल्प -----

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी