शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:06 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत.  दरम्यान, राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. यामुळे आता या ठिकाणच्या निवडणुका पुढील काही दिवसांनी होणार आहेत. यामध्ये बदलापूर, अंबरनाथ, बारामती यासह आणखी काही शहरातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.  

'निवडणुका काही वार्डात अचानक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा निर्णय'; यशोमती ठाकुर यांचा हल्लाबोल

नगरपरिषद निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.  राज्यातील २० नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या

राज्यातील साधारण २० जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

अंबरनाथ आणि बदलापूरातही स्थिगिती

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिषदेच्या निवडणुकीतही याचा फटका बसला. तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील सहा प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित झाली आहे. ही निवडणूक आता २० दिवस लांबणीवर गेली असून पूर्वी २ डिसेंबरला होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. 

यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषदेचीही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येथील दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक २० डिसेंबरला होणार आहेत. 

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. त्याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये १० डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर २० डिसेंबर मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती आहेत.  

सोलापूर 

जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका सुधारीत कार्यक्रम

नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर 

चिन्ह वाटप व अंतिम यादी ११ डिसेंबर 

मतदान २० डिसेंबर 

मतमोजणी २१ डिसेंबर, असा कसुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

धाराशिव

धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. २ अ, ७ ब आणि १४ ब) अखेर सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला. 

सुधारित निवडणूक कार्यक्रम

जिल्हाधिकारीांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : ०४ डिसेंबर २०२५

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक :१० डिसेंबर २०२५, दुपारी ३.۰۰ वाजेपर्यंत

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक :११ डिसेंबर २०२५

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक :२० डिसेंबर २०२५(सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक :२१ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजल्यापासून

चंद्रपूर

जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली.  या निवडणुकीची प्रक्रिया ४ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक माहिती आहे. 

अकोला

अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय. नगराध्यक्ष पदासह सर्व २५ जागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. 

नांदेड

नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. आता, येथील निवडणुकांसाठी २३ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी आहे.

पुणे 

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील १२ जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी ६ जागांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सुनील शेळकेंच्या बंधूच्या जागेची देखील निवडणूक पुढं ढकलली. पुण्यातील मावळ तालुक्यात दोन नगरपरिषदांमधील १२ जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात. 

बारामती 

बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता २० डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट २० डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Election Commission Postpones Local Elections in Several Cities Due to Irregularities

Web Summary : Maharashtra Election Commission postponed local body elections in areas like Badlapur, Ambernath, and Baramati due to delayed court rulings on candidate applications, insufficient time for withdrawals, and pre-allocated symbols. Revised voting is scheduled for December 20 in affected districts.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCourtन्यायालय