शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! विनायक ग्रुप, अबू आझमींशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 19:09 IST

Abu Azmi IT Raid: एप्रिल महिन्यात अबू असीम आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते.

उत्तर प्रदेशमधून सध्याच्या घडीची मोठी बातमी येत आहे. आयकर विभागाने वाराणसीमध्ये मोठे छापासत्र सुरु केले आहे. यामध्ये विनायक ग्रुप आणि सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमींशी संबंधित ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.  याचबरोबर आयकर विभागाच्या टीमने मुंबई आणि दिल्लीमध्येही अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. 

एप्रिल महिन्यात अबू असीम आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते. प्राप्तिकर विभागाने वाराणसीच्या विनायक ग्रुपची चौकशी सुरू केल्यानंतर आझमी यांच्याशी धागेदोरे आयकर विभागाला सापडले होते. 

एवढेच नाही तर आयकर व ईडीने इतर ठिकाणीही छापेमारी केली आहे. पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. चेन्नईतील डीएमके खासदार एस जगतरक्षकन यांच्या घरावर आयटीने छापा टाकला. तेलंगणातील बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ आणि कर्नाटकातील शिवमोग्गा येथील डीसीसी बँकेचे अध्यक्ष मंजूनाथ गौड़ा यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. 

विनायक ग्रुप आणि अबू आझमींचा संबंध काय? विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, व्यावसायिक शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. कागदोपत्री विनायक ग्रुपमध्ये तीन भागीदार होते- सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता. आभा गुप्ता या दिवंगत गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. गणेश गुप्ता हे आझमींचे जवळचे मित्र आणि सहकारी असल्याचे सांगितले जाते. गणेश गुप्ता महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते आणि कुलाबा येथील आझमी यांच्या इमारतीतून त्यांचे कार्यालय चालवत होते.

तपासादरम्यान तिन्ही भागीदारांच्या व्हॉट्सअॅप चॅट, ईमेल आणि स्टेटमेंट अॅक्सेस करण्यात आले होते. विनायक ग्रुपमधून मिळणारे उत्पन्न चार भागात वाटून घेतले जात होते. हा चौथा भाग अबू असीम आझमी यांच्याकडे गेल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. आजतकने ही बातमी दिली आहे. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीIncome Taxइन्कम टॅक्सSamajwadi Partyसमाजवादी पार्टी