शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 11:09 IST

Mumbai Toll Free From Tonight: आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू, वरळी सीलिंक वगळण्यात आला आहे.

दीड दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंना हा मुद्दा उचलला होता. मुंबईत एवढी वाहने येतात-जातात त्याचा हिशेब त्यांनी राज्य सरकारकडे मागितला होता. तसेच हे टोल बंद करण्याची मागणी करत टोलनाक्यांवर कॅमेरे लावून वाहनांची मोजणी केली गेली होती. यानंतर काही महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा छोट्या कार चालकांना मोठा फायदा होणार आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई