Shiv Sena Shinde Group News: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव येथील काँग्रेसचे विधी उपाध्यक्ष ॲड अशोक गंगाराम कापसे, काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शिकारे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात तळागाळात शिवसेना पोहोचल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्यासह मरखेलचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक रेड्डी, व्यंकट पाटील, धनाजी पाटील, गंगाधर लोणे, सरपंच आनंद राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुनसर, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे असे सात सरपंच तर बळीराम बेगडे आणि पांडुरंग वाघमारे हे माजी सरपंच तसेच असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तळागाळातील लोकांना शिवसेना ही आपली वाटू लागली
गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील महायुतीच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक विकासकामे करण्यात आली. त्यामुळेच तळागाळातील लोकांना शिवसेना ही आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चांदा ते बांदा शिवसेनेचा विस्तार होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार चांगल्या पद्धतीने होत असून दिवसेंदिवस पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, बालाजी पाटील खतगावकर, भद्रावती वरोरा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे आणि शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
Web Summary : Congress leaders from Deglur, Nanded, including key officials and sarpanches, joined Shiv Sena in the presence of Eknath Shinde. Shinde welcomed them, highlighting the growing strength and expansion of Shiv Sena across the region due to developmental works.
Web Summary : नांदेड़ के देगलुर से कांग्रेस नेताओं, जिनमें प्रमुख पदाधिकारी और सरपंच शामिल हैं, ने एकनाथ शिंदे की उपस्थिति में शिवसेना में शामिल हो गए। शिंदे ने उनका स्वागत किया और विकास कार्यों के कारण क्षेत्र में शिवसेना की बढ़ती ताकत और विस्तार पर प्रकाश डाला।