शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रेच्या पतीचा आरोप; भाजपाच्या तीन आमदारांना हत्येची होती माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:10 IST

माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येची भाजपाच्या तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरुंदकर याच्या फ्लॅटवर ‘त्या’ रात्री येऊन गेले होते, असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर -  माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येची भाजपाच्या तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरुंदकर याच्या फ्लॅटवर ‘त्या’ रात्री येऊन गेले होते, असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे व भाऊ आनंद यांनी पोलीस यंत्रणेवर मोठा राजकीय दबाव असल्याचा आरोप करून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. अभयचा भाऊ संजय कुरुंदकर पुण्यात पोलीस दलात आहे. तो साक्षीदारांवर दबाव आणत असल्याने त्याची बदली गडचिरोलीला करावी, अशा मागणीही त्यांनी केली.राजू गोरे म्हणाले, ‘माझी पत्नी अश्विनी दि. ११ एप्रिल २०१६पासून बेपत्ता आहे. त्याच दिवशी संध्याकाळी राजेश पाटील व भाजपाचे तीन आमदार अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेथे अभय कुरुंदकर याचा फोन आला. त्यानंतर हे चौघेही कुरुंदकर याच्या फ्लॅटवर गेले. त्यामुळेच त्यांना या हत्येची पूर्ण कल्पना होती. अश्विनी यांचे भाऊ आनंद म्हणाले, ‘आतापर्यंत शासनयंत्रणेमधील मुख्यमंत्र्यांपासून ते कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांपर्यंत कुणीही आमची भेट घेतलेली नाही.’बाईला मारण्यात कसला पुरुषार्थ?लष्करामध्ये १८ वर्षे सेवा बजावलेले जयकुमार बिद्रे म्हणाले, ‘परिस्थिती नसतानाही मी तीन मुलांना शिकवलं. अश्विनी शिकली. चांगल्या नोकरीला लागली. एकदा मुलं मोठी झाल्यावर त्यांना आम्ही कशाबाबत आणि काय सांगायचं? मात्र एका बाईला मारण्यात कसला आलाय पुरुषार्थ? या प्रकरणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र