विडी कामगारांसमोर झुकावे लागेल

By Admin | Updated: June 27, 2016 04:40 IST2016-06-27T04:40:03+5:302016-06-27T04:40:03+5:30

२००३मधील जाचक तरतुदींमुळे विडी उद्योगासमोर मोठे संकट उभे आहे. विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Bidi workers have to bow | विडी कामगारांसमोर झुकावे लागेल

विडी कामगारांसमोर झुकावे लागेल


सोलापूर : २००३मधील जाचक तरतुदींमुळे विडी उद्योगासमोर मोठे संकट उभे आहे. विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. विडी उद्योग वाचविण्यासाठी ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, आंदोलकांसमोर सरकारला झुकावे लागेल, असा इशारा सीटूचे अ. भा. महासचिव तथा खा. तपन सेन यांनी येथे दिला.
आॅल इंडिया विडी वर्कर्स फेडरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने रविवारी पुंजाल मैदानावर जाहीर सभा झाली. विडी उद्योग वाचवण्याबाबत केंद्र सरकार उदासीन आहे. उलट कारखानदार कामगारांना वेठीस धरून बेकायदेशीरपणे अनेक महिने कारखाने बंद ठेवण्याचे कट रचत आहेत.
सोलापुरातील कामगारांनी केंद्र आणि राज्य सरकारशी दोन हात करण्यासाठी ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन खा. सेन यांनी केले.
विडी उद्योगातील कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व लाभ मिळाले पाहिजेत, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे, विडी कामगारांना किमान ३ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे आदी मागण्या माजी आमदार नरसय्या आडम यांनी केल्या. कॉ. के. माधवा, जे. बाळकृष्ण शेट्टी, सय्यद मुजीब (कर्नाटक), देबाशिष रॉय, माजी खा. अबुलहसनात खान, एम. एच. शेख, फातिमा बेग (महाराष्ट्र) आदी उपस्थित होते. ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bidi workers have to bow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.