'बिभीषण'कार मुकेश रावल यांचा रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

By Admin | Updated: November 16, 2016 20:48 IST2016-11-16T20:48:12+5:302016-11-16T20:48:12+5:30

रामानंद सागर दिग्दर्शित रामायण या मालिकेत बिभिषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह सापडला आहे.

'Bibhishan' found dead on Mukesh Rawal's railway track | 'बिभीषण'कार मुकेश रावल यांचा रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

'बिभीषण'कार मुकेश रावल यांचा रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - रामानंद सागर दिग्दर्शित रामायण या मालिकेत बिभिषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह सापडला आहे. रावल यांचा मृतदेह कांदिवलीतल्या रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कांदिवली रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून रावल यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरला गेले होते, मात्र ते घरी परतलेच नाहीत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. अखेर शोधाशोध केली असता मुकेश रावल यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समजल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
मुकेश रावल हे काल घरातून बाहेर गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली, त्यावेळी फोटो दाखवून पोलिसांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

Web Title: 'Bibhishan' found dead on Mukesh Rawal's railway track