भुसावळ-मुंबई पॅसेंजर अचानक रद्द
By Admin | Updated: May 3, 2017 03:30 IST2017-05-03T03:30:07+5:302017-05-03T03:30:07+5:30
भुसावळहून मुंबईला जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द केली. याबाबत सकाळी

भुसावळ-मुंबई पॅसेंजर अचानक रद्द
भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळहून मुंबईला जाणारी पॅसेंजर गाडी मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द केली. याबाबत सकाळी प्रशासनातर्फे उद्घोषणा केली गेली.
भुसावळ येथून निघणारी ही पॅसेंजर गाडी भुसावळ ते मुंबईदरम्यान सुमारे ५० स्थानकावर थांबते. दरम्यान, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात एका मालगाडीला सोमवारी अपघात झाला होता. या बदल्यात भुसावळ येथे येणारी ५११५३ मुंबई -भुसावळ या गाडीचे डबे जोडून ती सोलापूर मार्गावर चालविण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुंबईहून गाडी न आल्याने मंगळवारी मुंबईला जाणारी गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)