भुजबळांची प्रकृती स्थिर
By Admin | Updated: November 3, 2016 05:43 IST2016-11-03T05:43:56+5:302016-11-03T05:43:56+5:30
माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना गुरुवारी काही तपासण्यांसाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

भुजबळांची प्रकृती स्थिर
मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना गुरुवारी काही तपासण्यांसाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. हृदयाचे ठोके अनियमित पडत असल्याने, त्यांच्या काही तपासण्या खासगी रुग्णालयात करण्यात येणार आहेत.
आॅर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागल्यामुळे जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आल्यावरही हृदयाचे ठोक अनियमित होते. त्यामुळे त्यांची हॉल्टर मॉनेटरिंग टेस्ट करण्यात आली. २४ तास ही तपासणी सुरू होती. सप्टेंबर महिन्यात भुजबळ जे.जे. रुग्णालयात दाखल असताना, थॅलियम सीटी स्कॅन, इलेक्ट्रो फिजिलॉजी स्टडी आणि २४ तासांचा इसीजी या तीन तपासण्या करायच्या होत्या, पण जे. जे. रुग्णालयात या तपासण्या होत नसल्याने, रुग्णालय प्रशासनाने कारागृहाला पत्र लिहिले होते. भुजबळ यांच्या छातीत दुखत असल्यामुळे या तपासण्या करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)