भ्रष्टाचाराप्रकरणी भुजबळांची चौकशी होणारच
By Admin | Updated: February 2, 2015 13:38 IST2015-02-02T13:34:12+5:302015-02-02T13:38:28+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना दणका दिला आहे.

भ्रष्टाचाराप्रकरणी भुजबळांची चौकशी होणारच
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवल्याने भुजबळ यांची चौकशी अटळ आहे.
आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील ११ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी करावी असे आदेश राज्य सरकारला दिले होते. या निर्णयाविरोधात भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात भुजबळ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. प्रशांत भूषण यांनी अंजली दमानिया यांची बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत भुजबळांना दणका दिला. याप्रकरणी भुजबळ यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टाकडेच अपील करावे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.