एक ‘भूगाव’ दहा आयएसओ मिळवणारे...

By Admin | Updated: January 25, 2015 01:18 IST2015-01-25T01:18:26+5:302015-01-25T01:18:26+5:30

माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगाला वैश्विक खेडे आणि खेडेगावांना वैश्विक आयाम प्राप्त झाला.

A 'Bhugaon' getting ten ISOs ... | एक ‘भूगाव’ दहा आयएसओ मिळवणारे...

एक ‘भूगाव’ दहा आयएसओ मिळवणारे...

प्रदीप पाटील ल्ल पौड (जि. पुणे)
माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगाला वैश्विक खेडे आणि खेडेगावांना वैश्विक आयाम प्राप्त झाला. आधुनिक बदलांच्या वाटेवर एक पाऊल पुढे असणारे पुणे जिल्ह्यातील भूगाव, हे तर गुगल सर्चवर सर्वाधिक हिट मिळविणारे गाव ठरले आहे. कारण या गावाला भारतीय मानक संस्थेची (आयएसओ) तब्बल १० मानांकने मिळाली आहेत!
पुणे शहराच्या हद्दीपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटरवरील १५ ते १६ हजार लोकवस्तीचं हे अनेक बाबतीत तसं प्रागतिक असलेलं गाव. मोठ्या शहरालगत असूनही आपलं ‘गावपण’ शाबूत ठेवणारं, पर्यावरणप्रमी, मूलभूत सुखसुविधांसह शिक्षणाला प्राधान्य देणारं आणि एवढं असूनही गुण्यागोविंदानं नांदणारं गाव, अशी या भूगावची ख्याती. देशात स्वच्छता मोहीम सुरू होण्याअगोदर या गावातील लोकांनी हातात झाडू घेऊन गाव कसं ुनर्मल करून टाकलेलं.
आज या गावात १00 टक्के शौचालये झाली असून, गाव हगणदरीमुक्त आहे. आतापर्यंत भूगावला निर्मलग्राम, तंटामुक्ती पर्यावरण, हगणदरीमुक्त असे अनेक राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयएसओ मानांकनासाठी असलेले ७६ प्रकारचे निकष ग्रामपंचायतीने ‘अ ’श्रेणीत पूर्ण केले आहेत.

च्ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज व अद्ययावत इमारतीत एकूण आठ कक्ष. सर्व कार्यालये एकाच छताखाली
च्सर्व कॉक्रीटचे रस्ते व कचरामुक्त गाव
च्४ कर्मचारी, ६ मजूर व ग्रामस्थांच्या सहकार्याने साफसफाई
च्ग्रामपंचायतीत उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धतीने कर्मचारी हजेरी नोंदणी
च्महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
च्सातवीपर्यंच्या दोन्ही शाळांत प्रत्येकी २ हजार पुस्तकांची सुसज्ज ग्रंथालय.
च्शाळेत सर्व आर्थिक स्तरांतील मुली. इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा कल कमी होऊन शाळेच्या पटात लक्षणीय वाढ.

टँकरमुक्त गाव
भूगावला दररोज ७ लाख लिटर पाणी लागते. त्यातील १ लाख लिटर पाणी महानगरपालिकेकडून मिळते. ते पुरेसे नसल्याने गावातील एक ग्रामस्थ बाळासाहेब चोंधे यांनी स्वत:च्या शेतीतील खासगी विहिरीचे पाणी गावासाठी २४ तास उपलब्ध करून दिले आहे. मागील वर्षी टँकरने पाणी पिणारे भूगाव आज १00 टक्के टँकरमुक्त झाले आहे.
आधुनिक वैकुंठधाम!
च्स्मशानभूमीतील धुराच्या प्रदूषणाचा त्रास ग्रामस्थांना होऊ नये म्हणून येथे स्वयंचलित निर्धूर यंत्रणा बसवण्यात आली असून, आवश्यक निवारा, वीज, पाणी, आप्तेष्टांसाठी विसावा कक्षही तयार करण्यात आला आहे.
च्ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख कार्यालय, चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव.

सरपंचाचे पद हे सर्व समस्या सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असते. मी त्यासाठी काम केले़ त्यामुळे आम्हाला हे यश मिळाले.
- विजय सातपुते, सरपंच
गावातील जबाबदार नागरिकांनी योग्य सल्ला, मार्गदर्शन केले तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकतात; आम्ही तेच केले.
- दगडू काका करंजावणे, संंकल्पनेचे प्रेरक

Web Title: A 'Bhugaon' getting ten ISOs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.