शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

भोसी गावाने 'अशी' तोडली कोरोनाची साखळी; नांदेडच्या ZP सदस्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ थोपटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 07:01 IST

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख यांचे केंद्र सरकारने केले कौतुक

हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोना महामारीत ग्रामीण भागात चाचण्या किंवा इतर आवश्यक सुविधा मोठ्या कष्टाने उपलब्ध असताना भोसी (जिल्हा नांदेड) खेड्याने महामारीला ज्या पद्धतीने तोंड दिले त्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रशंसा केली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश देशमुख- भोसीकर यांनी केलेल्या कमालीच्या परिणामकारक कामाची सरकारने गुरुवारी अधिकृतपणे त्याची नोंद घेतली.

दोन महिन्यापूर्वी लग्न समारंभानंतर भोसीतील मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच रुग्ण आढळल्यानंतर गावात एकच क्षोभ निर्माण झाला.  प्रकाश देशमुख यांनी गावात कोविडच्या चाचण्या घेण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. रॅपिड अँटिजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचण्यातून ११९ जण कोविड-१९ सकारात्मक (पॉझिटिव्ह) असल्याचे स्पष्ट झाले. 

पंतप्रधानांनी दिली पावतीग्रामीण भागात असलेल्या आव्हानांवरून इशारा दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या विषयाची माहिती दिली. ते म्हणाले,‘ग्रामीण भागात लोकांमध्ये कोविड-१९ बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पंचायत राज व्यवस्थांकडून सहकार्य मिळविणे, हे सारखेच महत्त्वाचे आहे.’

कोरोना विषाणू फैलावाची साखळी तोडण्यासाठी या रुग्णांचे विलगीकरण करण्याचे ठरवले गेले. या पॉझिटिव्ह लोकांनी त्यांच्या शेतात १५ ते १७ दिवस राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले. ज्या पॉझिटिव्ह लोकांना शेत नव्हते त्यांची सोय भोसीकर यांच्या स्वत:च्या शेतात ४० बाय ६० फूट आकाराच्या तात्पुरत्या निवाऱ्यात (शेड) करण्यात आली. आशाताई या अंगणवाडी सेविका रोज शेतांना भेट द्यायच्या. १५ ते २० दिवसांच्या विलगीकरणानंतर ग्रामस्थांची पुन्हा आरोग्य तपासणी केली गेली व त्यानंतरच ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी