भायखळ्यातील प्रेमी युगुल भुसावळमध्ये ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 22:24 IST2017-02-05T22:24:17+5:302017-02-05T22:24:17+5:30

भायखळा येथील प्रेमीयुगलाला भुसावळात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त मोहिम राबवून रविवारी रात्री ताब्यात घेतले.

Bhiwhalase lover in Jugal Bhusawal | भायखळ्यातील प्रेमी युगुल भुसावळमध्ये ताब्यात

भायखळ्यातील प्रेमी युगुल भुसावळमध्ये ताब्यात

>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 5 - भायखळा येथील प्रेमीयुगलाला भुसावळात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त मोहिम राबवून रविवारी रात्री ताब्यात घेतले. अल्पवयीन तरुणीला पळवून नेली जात असल्याची तक्रार पित्याने दाखल केल्यानंतर मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार संशयीत आरोपी आमाद अहमद शाहिदअली गोभिया (वय २०, बस्ती, उत्तरप्रदेश) याने भायखळा पोलीस ठाणे हद्दीतून अल्पवयीन युवतीस प्रेमसंबंधातून पळवून नेल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत तरुणीला डाऊन गोरखपूर एक्स्प्रेसने नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळात एक्स्प्रेसची रविवारी रात्री पावणेनऊ वाजता तपासणी केल्यानंतर उभय दोघांना सर्वसाधारण डब्यातून ताब्यात घेण्यात आले.
लोहमार्गचे पोलीस निरीक्षक डी.बी.सरक, लोहमार्ग गुन्हे शाखेचे सह निरीक्षक उज्वल पाटील, उपनिरीक्षक शब्बीर शेख, त्र्यंबक वाघ, संजय साळुंखे, ए.एस.आय भरत शिरसाठ, अलका आढाळे, नीता तडवी तसेच आरपीएफचे रोशन खान, शेख नावेद यांचा कारवाईत सहभाग होता.
दरम्यान, भायखळा पोलिसांना कारवाईची माहिती कळवण्यात आली असून ते सोमवारी आरोपीसह तरुणीस ताब्यात घेणार असल्याचे निरीक्षक सरक म्हणाले.

Web Title: Bhiwhalase lover in Jugal Bhusawal