लोकमत इम्पॅक्ट! भिवंडी मनपा प्रशासनाला आली जाग; कचऱ्याचा ढिगारा उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 17:04 IST2021-06-29T17:03:32+5:302021-06-29T17:04:52+5:30
मंगळवारी सकाळीच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अंजुरफाटा येथे साचलेला कचऱ्याचा ढिग जेसीबीच्या साहाय्याने उचलला.

लोकमत इम्पॅक्ट! भिवंडी मनपा प्रशासनाला आली जाग; कचऱ्याचा ढिगारा उचलला
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात असलेली अंजुरफाटा येथे मुख्य रस्त्याच्याया बाजूला कचऱ्याचे ढिग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तर या कचऱ्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच स्थानिक नागरिकांना या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत सोमवारी लोकमत ऑनलाइन न्यूज चॅनलसह मंगळवारी दै. लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाली असता मनपा प्रशासनाला जाग आली असून मंगळवारी सकाळीच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अंजुरफाटा येथे साचलेला कचऱ्याचा ढिग जेसीबीच्या साहाय्याने उचलला. त्याचबरोबर या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात देखील मनपाच्या वतीने औषध फवारणी कारण्यताली आहे. दै. लोकमतने या बाबीची दखल घेतल्याने स्थानिक नागरिकांसह येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दै. लोकमतचे आभार मानले.