शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कारखाना; महाडिकांचे वर्चस्व

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक

मोहोळ (सोलापूर) : सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक यांनी ४८३४ एवढ्या मोठ्या फरकाने परिचारक-पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले़भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली होती़ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी भीमाच्या कारभाराचे वाभाडे काढत भ्रष्टाचार व कर्जाचे आरोप केले होते़ परंतु चेअरमन धनंजय महाडिक यांनी कारखान्याचा केलेला विकास, विस्तारीकरण, को-जन. असे प्रमुख मुद्दे प्रचारात जोरकसपणे मांडले़ सभासदांनीही त्यांच्या या कामाला प्रचंड प्रतिसाद देत त्यांच्या मतांचा भरभरून वर्षाव करून पसंतीची मोहोर उमटवली़ पहिल्या फेरीत पुळूज गटापासून घेतलेले मताधिक्य वाढत वाढत शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहून ४८३४ एवढ्या जादा मताधिक्याने परिचारक-पाटील आघाडीवर मात करीत विजय संपादन केला़भीमा परिवाराच्या शेतकरी विकास आघाडीचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह १४ उमेदवारांना सुमारे १० हजारांहून अधिक मते मिळाली़ तर विरोधी परिचारक-पाटील आघाडीच्या उमेदवारांना ५७०० मतांवर समाधान मानावे लागले़