मराठा क्रांती मोर्चाला भिडे गुरुजींचा पाठिंबा

By Admin | Updated: September 22, 2016 16:34 IST2016-09-22T16:34:44+5:302016-09-22T16:34:44+5:30

27 सप्टेंबरला सांगलीत निघणा-या मराठा क्रांती मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी पाठिंबा दर्शवला आहे

Bhide Guruji's support for the Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाला भिडे गुरुजींचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला भिडे गुरुजींचा पाठिंबा

>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा निघत असताना सांगलीतही मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 27 सप्टेंबरला निघणा-या मराठा क्रांती मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
 
27 सप्टेंबरला काढण्यात येणा-या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून  रॅलीचं आयोजन केलं होतं. मराठा मोर्चा कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे गुरुजींनी संघटीत झालेल्या मराठा समाजाचे कौतुक करत, मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
 
'महाराष्ट्रातील मराठा पेटून उठलाय ही चांगली गोष्ट आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने संबंध मराठा आणि महाराष्ट्र पेटून उठालाय, हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं', असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.
 

Web Title: Bhide Guruji's support for the Maratha Kranti Morcha