भय्यू महाराज यांची प्रकृती स्थिर

By Admin | Updated: December 14, 2014 01:07 IST2014-12-14T01:07:57+5:302014-12-14T01:07:57+5:30

अपघातात जखमी झालेले राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना सोलापूरमधील गंगामाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आह़े

Bhayyu Maharaj's condition is stable | भय्यू महाराज यांची प्रकृती स्थिर

भय्यू महाराज यांची प्रकृती स्थिर

सोलापूर : अपघातात जखमी झालेले राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना सोलापूरमधील गंगामाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आह़े भक्तगण, शिष्य आणि राजकीय क्षेत्रतील मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली़ 
कळंब-अंबेजोगाई मार्गावर पैठण गावाजवळ शुक्रवारी रात्री त्यांच्या कारचा अपघात होऊन पाय, छाती आणि डोक्याला मार बसला़ मुका मार बसल्याने त्यांना त्रस होऊ लागला़ रात्री 11़15 वाजता सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल़े शनिवारी दिवसभरात माजी आ़ हर्षवर्धन पाटील, आ़ दीपकआबा साळुंखे-पाटील, आ़ मधुकर चव्हाण, माजी आ़ सुधाकरपंत परिचारक, प्रशांत परिचारक, मयूर कलाटे, राजेंद्र मिरगणो यांनी भय्यू महाराज यांना भेटून प्रकृतीची चौकशी केली़ याशिवाय दिवसभरात लोकसभेच्या सभापती सुमित्र महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली़ 

 

Web Title: Bhayyu Maharaj's condition is stable