भय्यूजी महाराज पुन्हा अडकणार विवाहबंधनात

By Admin | Updated: April 26, 2017 22:44 IST2017-04-26T22:44:59+5:302017-04-26T22:44:59+5:30

अनेक बड्या राजकारण्यांचे आध्यात्मिक गुरू असलेले आणि गतवर्षी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालेले भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत

Bhayyaji Maharaj will again get married again | भय्यूजी महाराज पुन्हा अडकणार विवाहबंधनात

भय्यूजी महाराज पुन्हा अडकणार विवाहबंधनात

>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 26 - अनेक बड्या राजकारण्यांचे आध्यात्मिक गुरू असलेले आणि गतवर्षी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालेले भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत.  भय्यूजी महाराज डॉ. आयुषी यांच्याशी 30 एप्रिल रोजी विवाहबद्ध होणार आहेत. त्यांचा विवाह 30 एप्रिल रोजी इंदूर येथील त्यांच्या घरी संपन्न होईल. 
भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे गतवर्षी निधन झाले होते. तसेच त्यांच्या वडिलांचाही दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर महाराजांची आई वृद्धावस्थेमुळे आजारी असते. गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक कारणांमुळे महाराज सार्वजनिक जीवनात सक्रियपणे सहभाग घेऊ शकले नव्हते.  
भय्यूजी महाराजांनी पुन्हा विवाह करावा, असा आग्रह त्यांची आई, दोन्ही मोठ्या बहिणी आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती करत होते. अखेर त्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला, आता ते 30 एप्रिल रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होतील, अशी माहिती त्यांच्या सूर्योदय परिवाराचे विश्वस्त तुषार पाटील यांनी दिली. 

Web Title: Bhayyaji Maharaj will again get married again