भय्याजी जोशी यांची संघाच्या सरकार्यवाहपदी फेरनिवड
By Admin | Updated: March 14, 2015 18:02 IST2015-03-14T17:59:46+5:302015-03-14T18:02:43+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे

भय्याजी जोशी यांची संघाच्या सरकार्यवाहपदी फेरनिवड
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी भय्याजी जोशी सरकार्यवाहपदाची धुरा सांभाळतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला कालपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली. आज भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली असून सलग तिस-यांदा ते हे पद भूषवणार आहेत.. २०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती.
संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात होत असलेल्या या तीन दिवसीय सभेत सरकार्यवाहपदासाठी दत्ताजी होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र आज झालेल्या निवडप्रक्रियेत भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी फेरनिवड करण्यावर एकमताने शिक्कामोर्तब झाले.