भय्यूजी महाराजांच्या गाडीवर हल्ला

By Admin | Updated: May 10, 2016 03:51 IST2016-05-10T03:51:17+5:302016-05-10T03:51:17+5:30

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला

Bhayoyaji Maharaj's car attacked | भय्यूजी महाराजांच्या गाडीवर हल्ला

भय्यूजी महाराजांच्या गाडीवर हल्ला

शिरूर (पुणे) : राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या चालकाला मारहाण केली. भय्यूजी महाराज यांना मात्र काहीही दुखापत झालेली नाही.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यूजी महाराज पुण्याहून इंदूरकडे जात असताना रांजणगाव एसटी स्थानकाजवळ त्यांच्या गाडीला एका ट्रकची धडक बसली. त्यात गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. ट्रकमधील दोघांनी मात्र त्यांच्या गाडीच्या चालकासोबत वाद घातला. त्यास मारहाण करून शिवीगाळ केली.
प्रकरणाची पोलीस तक्रार दिल्यानंतर भय्यूजी महाराज पुढील प्रवासासाठी निघून गेले. त्यांच्यासमवेत तुषार पाटील हे त्यांचे स्वीय सहायक होते. त्यांनीच पोलिसांत तक्रार नोंदविली.
रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. डी. इंदलकर यांनी सांगितले की, आरटीओकडून संबंधित ट्रकचा तपास लागला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhayoyaji Maharaj's car attacked