ठाणे मेट्रोचे वर्षभरात भूमिपूजन
By Admin | Updated: April 9, 2015 02:55 IST2015-04-09T02:55:55+5:302015-04-09T02:55:55+5:30
ठाणे मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन येत्या एक वर्षात केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतचे फेरसर्वेक्ष

ठाणे मेट्रोचे वर्षभरात भूमिपूजन
मुंबई : ठाणे मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन येत्या एक वर्षात केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतचे फेरसर्वेक्षण आणि तांत्रिक बाबींची पूर्तता लवकर केली जाईल, असे ते म्हणाले.
नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे येथे मेट्रो रेल्वे सुरू केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली
दिवा ही मेट्रो सुरू करण्याबाबतची लक्षवेधी सुभाष भोईर यांनी विधानसभेत मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
घाटकोपर, ठाणे, कासारवडवली हा मेट्रो मार्गाला मंजूरी दिली आहे. मात्र त्या पुढील कारवाई होत नाही. नागपूर, पुणे मेट्रोची घोषणा झाली आहे. अशा वेळी ठाणे मेट्रो बाबत सरकारची नक्की भूमिका काय आहे, असा प्रश्न या चर्चेवेळी प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ठाणे मेट्रो लवकर मार्र्गी लागावी ही सरकारची भूमिका आहे.
कल्याण डोंबिवली दिवा येथील लोकांची मागणी लक्षात घेता येथेही मेट्रो व्हावी, या बाबत सकारात्मक विचार करू. सध्या एमयुटीपी
तीन अंतर्गत येणारे प्रकल्प पुर्ण करण्यावरच सरकारचा भर राहील. त्यामुळे मेट्रो बाबतच्या वेगवेगळ्या शहरातून होत असलेल्या मागण्यांचा टप्प्याटप्प्यानेच विचार केला
जाईल. आत्ताच त्या बाबत निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)