भाईंदर महापालिकेत आता एसी घोटाळा
By Admin | Updated: April 28, 2016 04:02 IST2016-04-28T04:02:56+5:302016-04-28T04:02:56+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेत वातानुकूलित यंत्राचा घोटाळा समोर आला आहे.

भाईंदर महापालिकेत आता एसी घोटाळा
मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेत वातानुकूलित यंत्राचा घोटाळा समोर आला आहे. पालिकेने तीन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवण्याची निविदा दिली असताना कंत्राटदाराने प्रत्यक्षात दोन तारांकित यंत्र बसवून त्याचे बिलही घेतले आहे.
महापालिका प्रशासनाने महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या दालनांसह पालिका अधिकारी, प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी ४२ यंत्रे खरेदी व त्याच्या बसविण्याचे कंत्राट युटीलिटी एंटरप्रायझेसला दिले होते. पालिकेच्या निविदेनुसार तीन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवण्याचे आदेश कंत्राटदारास दिले असताना त्याने चक्क दोन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवले. पालिकेच्या संबंधित कनिष्ठ अभियंत्यानेही कुठली पडताळणी केली नाही. कंत्राटदारास तीन तारांकित वातानुकूलित यंत्राच्या किमतीनुसार बिलही देऊन टाकले. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्याचे कंत्राटदाराशी संगनमत झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. खातरजमा न करताच लाखो रु पयांचे बिल देण्यात आल्याने पालिकेची फसवणूक झालेली आहे . या बाबत तक्र ार मिळताच मुख्यलेखा परीक्षक यांनी आयुक्तांना या बाबतचा लेखी अहवालच दिला आहे. (प्रतिनिधी)