भास्कर जाधवांना माफ करणार नाही : राणे

By Admin | Updated: October 9, 2014 23:03 IST2014-10-09T22:27:13+5:302014-10-09T23:03:07+5:30

माजी खासदार नीलेश राणे

Bhaskar will not forgive Jadhwa: Rane | भास्कर जाधवांना माफ करणार नाही : राणे

भास्कर जाधवांना माफ करणार नाही : राणे

चिपळूण : आपण भास्कर जाधव यांना १०० टक्के पाडू. आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आमचा उमेदवार निवडून येईल. भविष्यात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक लढविणार नाही, तर आपण रत्नागिरी जिल्ह्यात विशेषकरुन भास्कर जाधव जेथे उभे असतील, त्यांच्यासमोरच आपण निवडणूक लढवू. त्यांना कदापि माफ करणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. माजी खासदार राणे आज (गुरुवारी) गुहागर मतदार संघातील कार्यक्रमांसाठी आले असता चिपळूण येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गुहागरमधून निवडणूक लढविण्याबाबत त्यांना विचारले असता उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे आपल्याला निर्णय बदलावा लागला. अन्यथा मी पडलो असतो तरी माजी मंत्री जाधव यांना पाडून पडलो असतो. मतदारसंघात पाच वर्षे विकासकामे न केल्याने त्यांना आता जावेच लागणार आहे. भविष्यात जाधव किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीसमोर आपण लढविणार आहोत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रचार सभा गुहागरमध्ये होणार आहे. त्याचे नियोजन आज केले जाईल. वनमंत्री असताना गुहागरमधील शासकीय इमारतींच्या पुनरुज्जीवनासाठी, दुरुस्तीसाठी यांनी काही केले नाही. त्यामुळे नाराजी आहे. आमच्या रक्तात तडजोड नाही. चिपळूण विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारावर नाराजी आहे. सामाजिक स्तरावर त्यांनी मोठे काम केले नाही. उलट आमच्या उमेदवार रश्मी कदम यांचे काम आहे. आघाडी होईल, या अपेक्षेने आपण शेखर निकम यांना पाठिंबा दिला होता. परंतु, आता आमचा उमेदवार रिंगणात असल्याने आम्ही आमच्या उमेदवारासाठी काम करीत आहोत. माजी आमदार सुभाष बने यांच्याबाबतही त्यांनी तोंडसुख घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhaskar will not forgive Jadhwa: Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.